दि. २८ ऑगस्ट २०२५
जिल्हा परिषद, ठाणे
*जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ३१ ऑगस्ट २०२५ अखेर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन*
दि. २८ (जिल्हा परिषद, ठाणे) – जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत समाज कल्याण विभाग, कृषी विभाग, महिला व बाल विकास विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असून, पात्र दिव्यांग, मागासवर्गीय, शेतकरी, महिला व पशुपालक या सर्व लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र अर्जदारांनी आपले अर्ज ३१ ऑगस्ट, २०२५ पर्यंत जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://zpthaneschemes.com या लिंकवर ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे.
*विभाग निहाय्य योजना*
🔹 *समाज कल्याण विभाग*
*५% दिव्यांग कल्याण सेस अंतर्गत प्रमुख योजना:*
1.दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे.
2.दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी वाहन(स्कुटी) खरेदीसाठी अनुदान देणे
3.दिव्यांग-दिव्यांग व्यक्तिंना विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे.
4.दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायासाठी शेळीपालन वराहपालन, मत्स व दुग्धव्यवसाय इत्यादीसाठी अर्थसहाय्य देणे.
5.दिव्यांग पालकाच्या मुलीसाठी माझी लेक योजनेअंतर्गंत रु 50000/-मुदतठेव रक्कम ठेवणे.
6.उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्याना विशेष शिष्यवृत्ती देणे.
*२०% जिल्हा परिषद सेस अंतर्गत प्रमुख योजना:*
1.इ.5 वी ते 9 वी च्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकली पुरविणे.
2.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे (एकवेळ)
3.मागासवर्गीय इयत्ता 11वी व 12 वी तील विद्यार्थ्याना MH-CET ENINREEING/JEE//NEET च्या प्रशिक्षणवर्गाची खाजगी संस्थेला दिलेल्या फीची प्रतिपूर्ती करणे.
4.मागासवर्गीय लाभार्थ्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य देणे व वैयक्तिक लाभार्थी/महिला बचत गट यांना लघुउद्योगासाठी अर्थिक सहाय्य देणे.
5.मागासवर्गीय विद्यार्थ्यांना MSCIT संगणक / टंकलेखन (मराठी/इंग्रजी) प्रशिक्षण पुर्ण केल्यावर फी प्रतीपुर्ती करणे.
6.मागासवर्गीय लाभार्थ्यांना डिस्को जॅकी (D.J.) साहित्य पुरविणे.
🔹 *कृषी विभाग*
1. विविध सिंचन साहित्याचा पुरवठा करणे
2. सुधारित कृषि औजारांचा पुरवठा करणे
3. पिक संरक्षणाकरीता काटेरी तार/सौर कुंपणासाठी अर्थ सहाय्य करणे
4. कृषि क्षेत्रात प्लॅस्टिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे.
🔹 *महिला व बाल विकास विभाग*
1.महिलांना साहित्य पुरविणे – घरघंटी / पिको फॉल मशीन / शिलाई मशीन (९०% अनुदान)
2.इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना सायकल वाटप (१००% लाभ)
3.इयत्ता ७ वी ते १२ वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण (१००% लाभ)
4.विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलां-मुलींचा सत्कार (१००% लाभ)
🔹 *पशुसंवर्धन विभाग*
1.५०% अनुदानावर एक संकरित गाय / म्हैस वाटप योजना
2.५०% अनुदानावर (५+१) स्थानिक जातीचा शेळी गट वाटप
3.६०% अनुदानाने तबेलाधारकांसाठी रबरी मॅट, कडबाकुट्टी यंत्र, मिल्किंग मशीन पुरवठा योजना
*अर्ज पडताळणी वेळापत्रक*
• तालुका स्तर तपासणी : १ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर २०२५
• जिल्हा स्तर तपासणी : ८ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२५
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व सुलभ ठेवण्यात आली असून, सर्व पात्र लाभार्थ्यांनी ही सुवर्णसंधी साधून वेळेत अर्ज करावेत. स्थानिक ग्रामविकास अधिकारी, सरपंच, अंगणवाडी कर्मचारी, शाळा व महाविद्यालयांनी माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून अधिकाधिक लाभार्थी या योजनांचा लाभ घेऊ शकतील.
000
























