Homeआरोग्य“दिवा परिसरातील ५ लाख नागरिकांना आरोग्य सेवांपासून वंचित ठेवून ‘आपला दवाखाना’ बंद...

“दिवा परिसरातील ५ लाख नागरिकांना आरोग्य सेवांपासून वंचित ठेवून ‘आपला दवाखाना’ बंद :- ॲड.रोहिदास मुंडे

“दिवा परिसरातील ५ लाख नागरिकांना आरोग्य सेवांपासून वंचित ठेवून ‘आपला दवाखाना’ बंद :- ॲड.रोहिदास मुंडे

दिवा:- दिवा शहरातील ‘आपला दवाखाना’ हा ठाणे महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येणारा महत्त्वाचा आरोग्य सेवा उपक्रम कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आला असून या निर्णयामुळे दिव्यातील पाच लाखांहून अधिक नागरिकांच्या आरोग्य हक्कावर गदा आली आहे. याआधीच फिरता दवाखाना बंद करून नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित करण्यात आले होते आणि आता ‘आपला दवाखाना’ही बंद करून महानगरपालिकेने स्वतः दिलेल्या लिखित आश्वासनाचे उल्लंघन केले आहे.

आरोग्य ही घटना प्रदत्त मूलभूत हक्कांपैकी एक असून राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत जीवनाचा व आरोग्याचा हक्क अबाधित आहे. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य अधिनियम, 1949 आणि महाराष्ट्र नगरपालिकेचा कायदा यांनुसार ठाणे महानगरपालिकेवर नागरिकांना किमान आरोग्य सेवा पुरविण्याची वैधानिक जबाबदारी आहे. दिव्यातील नागरिकांकडून नियमित मालमत्ता कर व स्थानिक कर आकारले जात असूनसुद्धा आरोग्य सेवा न पुरविणे हे सार्वजनिक निधीचा दुरुपयोग व नागरिकांच्या हक्कांचा भंग आहे. या निष्काळजी व बेकायदेशीर कृतीमुळे भारतीय दंड संहिता कलम 166, 269, 336 आणि 304A अंतर्गत जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दिव्यात स्थायी दवाखाना व २४x७ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होईपर्यंत ‘आपला दवाखाना’ अखंडित सुरू ठेवणे आणि वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपत्कालीन सुविधा तसेच आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची तातडीची जबाबदारी आहे. अन्यथा दिव्यातील नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी आंदोलनात्मक पावले उचलावी लागतील तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय खुला राहील, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) कल्याण – कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे शहर प्रमुख सचिन पाटील महिला शहर संघटिका ज्योती पाटील युवा सेना अधिकारी अभिषेक ठाकूर विभाग प्रमुख रवी रसाळ नागेश पवार आकाश विचारे विकी मंचेवार आदी उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंब्रा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५० जणांचा घात केला;

मुंब्रा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५० जणांचा घात केला; मुंब्रा परिसरात गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पावधीत दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे...

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल! मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल ट्विट करत जाहीर...

सुवर्णवार्ता… सराफा बाजारात ‘सेल-ऑफ’चा तडाखा! सोने घसरले, चांदी गडगडली; तुमची गुंतवणूक किती सुरक्षित?

 सुवर्णवार्ता… सराफा बाजारात ‘सेल-ऑफ’चा तडाखा! सोने घसरले, चांदी गडगडली; तुमची गुंतवणूक किती सुरक्षित? Today's MCX Silver, Gold Rates 2 Feb 2026: सोने आणि चांदीच्या दरात...

Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं; चार वर्षीय चिमुकलीसोबत चालकाकडून संतापजनक कृत्य, ‘त्या’ स्कूल...

Badlapur Crime News : बदलापूर येथे स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. ज्या व्हॅनमध्ये ही घटना...

समृद्धी वामन – पोलीस कन्येची आकाशझेप!

समृद्धी वामन – पोलीस कन्येची आकाशझेप! ठाणे : प्रतिनिधी जिद्द, तपश्चर्या आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या बळावर आकाशालाच गवसणी घालणारी पोलीस कन्या कुमारी समृद्धी अजित वामन...

error: Content is protected !!