ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर यांच्या वतीने पावन पर्व छठपूजे निमित्त पाणी वाटपाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते अनंत परांजपे , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांच्या आदेशाने सदर उपक्रम रायलादेवी तलाव वागळे इस्टेट ठाणे येथे राबवण्यात आला.
छटपूजेचे महत्व उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आहे ,छटपूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्य पूजा आहे आणि हेच महत्त्व ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहराच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले यावेळी सदर उपक्रमाच्या वेळी माजी नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुहास देसाई ,सचिव महाराष्ट्र प्रदेश रमेश इंदिसे,ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरचिटणीस
मोहम्मद झिया सय्यद व्यापारी सेल उपाध्यक्ष आदेश सिंग ,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भागवत भद्रे, अध्यक्ष कोपरी पाचपाखाडी विधानसभा अजित ओझा, कार्याध्यक्ष आरोग्य सेल संतोष यादव ,सरचिटणीस युवक ठाणे जिल्हा विष्णू घाडगे ,अध्यक्ष अससंघटित कामगार सेल ठाणे शहर तौफिक शेख, तसेच ठाणे सरचिटणीस रमीज शेख आणि इतर पदाधिकारी ,कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर उपक्रमाचे आयोजन आदेश सिंह उपाध्यक्ष व्यापारी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे यांच्या वतीने करण्यात आले
























