Homeताज्या बातम्यावाहनाच्या धडकेत पडले, हेल्मेट असूनही जबर मार; ठाण्यात कॅडबरी जंक्शनवर दुचाकीस्वाराचा अंत,...

वाहनाच्या धडकेत पडले, हेल्मेट असूनही जबर मार; ठाण्यात कॅडबरी जंक्शनवर दुचाकीस्वाराचा अंत, कुटुंबाचा आधार हरपला

hane News : वाहनाच्या धडकेत पडले, हेल्मेट असूनही जबर मार; ठाण्यात कॅडबरी जंक्शनवर दुचाकीस्वाराचा अंत, कुटुंबाचा आधार हरपला
Thane Accident : ठाण्यात कॅडबरी जंक्शनजवळ वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. डोक्यात हेल्मेट असूनही त्यांना जबर मार बसला. त्यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त होत आहे.
विनित जांगळे, ठाणे : ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. संतोष भिलारे (४९) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून ते ठाणे पालिकेतील विविध कामांसाठी कंत्राटदार म्हणून काम करत होते. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
शास्त्रीनगर परिसरात राहणारे संतोष रविवारी कामानिमित्ताने दुचाकीवरुन जात असताना कॅडबरी जंक्शन येथे त्यांना वाहनाने धडक दिली. त्यांच्या डोक्यात हेल्मेट असूनही रस्त्यावर पडल्याने त्यांना जोरदार फटका बसला. त्यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती.
अखेर मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या आईवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले. गेल्याच आठवड्यात संतोष यांच्या सासऱ्यांचे निधन झाले. त्यांचे कुटुंबिय या धक्क्यातून सावरण्याआधीच त्यांच्यावर संतोष यांच्या मृत्यूने पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुटुंबियांसाठी धक्का
कौटुंबिक प्रपंचात व्यस्त असतानाही नेहमीच संतोषने सामाजिक भान जपले. आईच्या आजारपणाच्या धक्क्यातून ते नुकतेच सावरले होते. त्यातच त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाले. मात्र तरीही खचून न जाता ते प्रत्येकाच्या मदतीला धावून जात असे, प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करत असे. त्यांच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का असल्याची भावना संतोष यांचे मित्र किरण नाकती यांनी व्यक्त केली.
पालिका वर्तुळात हळहळ
ठाणे पालिकेत कंत्राटदार म्हणून लहान-मोठी कामे करताना संतोष यांनी कोणत्याही पद्धतीने गैरप्रकार केला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून
प्रभाग स्तरावरील अभियंते, कर्मचारी यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. त्यांच्या निधनाने पालिका वर्तुळातील अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली. दरम्यान, रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून दररोज रस्ते अपघातात मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. खड्डे, चालकांचा अती वेग, नियंत्रण सुटणं अशा अनेक कारणांनी अपघातात अनेकांचा मृत्यू होत असल्याचं चित्र आहॆ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छटपूजेनिमित्त पाणी वाटपाचे आयोजन

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर यांच्या वतीने पावन पर्व छठपूजे निमित्त पाणी वाटपाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य...

“दिवा परिसरातील ५ लाख नागरिकांना आरोग्य सेवांपासून वंचित ठेवून ‘आपला दवाखाना’ बंद :- ॲड.रोहिदास...

“दिवा परिसरातील ५ लाख नागरिकांना आरोग्य सेवांपासून वंचित ठेवून ‘आपला दवाखाना’ बंद :- ॲड.रोहिदास मुंडे दिवा:- दिवा शहरातील ‘आपला दवाखाना’ हा ठाणे महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येणारा...

जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ३१ ऑगस्ट २०२५ अखेर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे...

दि. २८ ऑगस्ट २०२५ जिल्हा परिषद, ठाणे *जिल्ह्यातील विविध विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ३१ ऑगस्ट २०२५ अखेर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन* दि. २८ (जिल्हा परिषद, ठाणे)...

खड्ड्यांमध्ये झाडे लावून दिवा मनसेचे अनोखे आंदोलन;ठाणे महानगरपालिकेचा केला निषेध

खड्ड्यांमध्ये झाडे लावून दिवा मनसेचे अनोखे आंदोलन;ठाणे महानगरपालिकेचा केला निषेध गणेशोत्सव चार दिवसांवर आला असूनही दिवा शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे अजूनही ठाणे महानगर पालिके कडून...

दिव्यात अतिवृष्टीमुळे अडकलेल्या १३ जणांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले.

⭕दिव्यात अतिवृष्टीमुळे अडकलेल्या १३ जणांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले. ठाणे ता २० ऑगस्ट : दिनांक १९/०८/२०२५ रोजी रात्रीच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या...

error: Content is protected !!