Homeताज्या बातम्याही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलोय; राज ठाकरेंसमोर उद्धव भाजपवर बरसले!

ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलोय; राज ठाकरेंसमोर उद्धव भाजपवर बरसले!

.ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलोय; राज ठाकरेंसमोर उद्धव भाजपवर बरसले!

BMC Election 2026: ज्यांना आधी मुंबई पाहिजे होती, अशा लोकांचे आज पुन्हा मुंबईचे लचके तोडण्याच मनसुबे आहेत. त्यामुळे आता आपण भांडत राहिलो तर आधीच्या लोकांनी केलेल्या संघर्षाचा आणि हुतात्मा स्मारकाचा अपमान होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन आज दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या आक्रमक शैलीत भाजपचा समाचार घेतला आणि मुंबई-महाराष्ट्रावर कोणी वाकड्या नजरने पाहिलं किंवा त्यांच्या कपटी-कारस्थानाने मुंबईला महाराष्ट्रापासून किंवा महाराष्ट्राला मुंबईपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत, असं म्हणत ठाकरेंनी आपल्या राजकीय विरोधकांवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “आमच्या दोघांचेही आजोबा, प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पहिल्या पाच सेनापतींपैकी एक होते. तसंच बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांच्यासह अख्खं ठाकरे घराणं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात संघर्ष करत होतं. मात्र मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर जेव्हा उपरे मराठी माणसाच्या उरावर नाचायला लागले तेव्हा न्याय हक्कांसाठी शिवसेनेची स्थापना करण्यात आली. त्यावेळी ज्यांना मुंबई पाहिजे होती, त्यांचे आज पुन्हा मुंबईचे लचके तोडण्याच मनसुबे आहेत. त्यामुळे आता आपण भांडत राहिलो तर हुतात्मा स्मारकाचा अपमान होईल. त्यामुळे आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत.”

उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्रासाठी संदेश

मनसेसोबतच्या युतीची घोषणा करताना उद्धव ठाकरे जनतेला आवाहन करत म्हणाले, “आमच्या युतीबाबत उत्साह अमाप आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर आज संपूर्ण देश बघतोय. मी सर्वांना विनंती आणि आवाहन करतोय, कारण विधानसभेच्या वेळी भाजपने जसा एक अपप्रचार केला होता की बटेंगे तो कटेंगे, तसं आता मी मराठी माणसांना सांगतोय, आता चुकाल तर संपाल. आता जर फुटाल तर पूर्ण संपून जाल. त्यामुळे तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका, असा संदेश आज मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देत आहे,” असं आवाहन ठाकरे यांनी केलं.

दरम्यान, “मला खात्री आहे की, मराठी माणूस सहसा कोणाच्या वाटेला जात नाही, पण त्याच्या वाट्याला कोणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही,” असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंब्रा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५० जणांचा घात केला;

मुंब्रा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५० जणांचा घात केला; मुंब्रा परिसरात गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पावधीत दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे...

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल!

भारत अमेरिकेच्या तालावर नाचतोय का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवरून प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारला सवाल! मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल ट्विट करत जाहीर...

सुवर्णवार्ता… सराफा बाजारात ‘सेल-ऑफ’चा तडाखा! सोने घसरले, चांदी गडगडली; तुमची गुंतवणूक किती सुरक्षित?

 सुवर्णवार्ता… सराफा बाजारात ‘सेल-ऑफ’चा तडाखा! सोने घसरले, चांदी गडगडली; तुमची गुंतवणूक किती सुरक्षित? Today's MCX Silver, Gold Rates 2 Feb 2026: सोने आणि चांदीच्या दरात...

Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं; चार वर्षीय चिमुकलीसोबत चालकाकडून संतापजनक कृत्य, ‘त्या’ स्कूल...

Badlapur Crime News : बदलापूर येथे स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. ज्या व्हॅनमध्ये ही घटना...

समृद्धी वामन – पोलीस कन्येची आकाशझेप!

समृद्धी वामन – पोलीस कन्येची आकाशझेप! ठाणे : प्रतिनिधी जिद्द, तपश्चर्या आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या बळावर आकाशालाच गवसणी घालणारी पोलीस कन्या कुमारी समृद्धी अजित वामन...

error: Content is protected !!