हे वय नव्हतं रितीक जाण्याचं! 24 वर्षांच्या पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरात संपवलं आयुष्य, नुकतीची वर्दी घातली होती अंगावर!
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात २०२३ च्या भरतीमध्ये रितिक चव्हाण भरती झाले होते.
भाईंदर : स्वातंत्र्यादिनाच्या पूर्व संध्येला राज्यभरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सर्वच पोलीस कर्मचारी ऑन ड्युटी हजर आहे. अशातच मुंबईजवळील भाईंदरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाईंदरमध्ये एका पोलीस शिपायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीस शिपायाच्या आत्महत्येमुळे ठाणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदरमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास एका पोलीस शिपायाने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रितिक भाऊसाहेब चव्हाण(24) असं आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचं नाव आहे. रितिक चव्हाण हे भाईंदर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. आज गुरुवारी दुपारी रितिक चव्हाण यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात २०२३ च्या भरतीमध्ये रितिक चव्हाण भरती झाले होते. त्यानंतर भाईंदर पोलीस ठाण्यात सध्या नेमणूक होती. रितीक हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे. पोलीस भरती झाल्यानंतर भाईंदर पश्चिमेच्या बेकरी गल्लीमध्ये भाडेतत्त्वावर राहत होते.
























