Homeताज्या बातम्या*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी*

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी*

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी*

*जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश*

ठाणे,दि.27(जिमाका): समाजमाध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलसारख्या ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत.
ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पेट्रोलियम नियम २००२ मधील तरतुदींनुसार जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवरून खुल्या स्वरूपात इंधन विक्री करण्यास तातडीने मनाई केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या या आदेशानुसार, आता जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल किंवा डिझेल केवळ वाहनांच्या इंधन टाकीमध्येच वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, डबे किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या भांड्यांमध्ये सुटे पेट्रोल अथवा डिझेल विकता येणार नाही. या नियमाचे उल्लंघन करणे बेकायदेशीर असून, पंपावरील सुरक्षितता जपण्यासाठी सर्व पेट्रोल पंप परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवणे आणि इंधन विक्रीच्या नोंदी नियमित ठेवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.
या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित पेट्रोल पंप मालक आणि व्यवस्थापकांची असणार आहे. हा आदेश २७ मार्च २०२६ पासून तात्काळ प्रभावाने लागू झाला असून, पुढील सूचना मिळेपर्यंत तो प्रभावी राहील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेवर पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींनुसार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या मोहिमेत पोलिसांचीही भूमिका महत्त्वाची असून ठाणे शहर, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त तसेच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना आवश्यक कार्यवाहीसाठी सूचित करण्यात आले आहे. तसेच हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी जिल्ह्यातील सर्व पंपांवर इंधनाचा पुरेसा साठा राहील याची दक्षता घ्यावी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन होत असल्याची खात्री करावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सार्वजनिक हितासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
00000000

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुध्दरत्न सागर वेलफेअर फाऊंडेशन आयोजित आठवी आंतरराष्ट्रीय बौध्दधम्म परिषद २०२६

प्रती, मा. संपादक / प्रतिनीधी/ छायाचित्रकार यांस.. आपणांस कळविण्यात येते की, ठाण्यामध्ये आठवी आतंरराष्ट्रीय धम्म परिषदेची आयोजन केले आहे. खालील वृत्त आपल्या लोकप्रिय वृत्तपत्र व वृत्तवाहीनी मध्ये प्रसिध्द...

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला...

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला सादर; महापौर शर्मिला पिंपळोलकर सभेच्या अध्यक्षस्थानी सन 2026-27 च्या मूळ अर्थसंकल्पातील...

*निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – महापौर शर्मिला पिंपळोलकर...

*निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे आवाहन* विशेष प्रतिनिधी ठाणे (11) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी...

मुंब्रा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५० जणांचा घात केला;

मुंब्रा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५० जणांचा घात केला; मुंब्रा परिसरात गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पावधीत दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे...

error: Content is protected !!