Homeताज्या बातम्या*निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – महापौर...

*निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे आवाहन*

*निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे आवाहन*

विशेष प्रतिनिधी

ठाणे (11) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी मालमत्ता करावरील शास्ती (दंड/व्याज) मध्ये 90% सूट देण्याची योजना राबविण्यात येत असून, नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेवून आपला मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करावा असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

महापौर दालनात झालेल्या पत्रकार परिषदेस गटनेते पवन कदम, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे उपस्थ‍ित होते

ठाणेकर करदात्यांनी महानगरपालिकेस निवासी मालमत्ता कर जमा करुन सहकार्य केले आहे. परंतु काही करदात्यांनी अद्याप कर भरलेला नाही, अशा करदात्यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे निवासी मालमत्ता करावर आकारलेले व्याज/दंड यामध्ये सवलत देणेबाबत विनंती केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त सौरभ राव यांचेशी चर्चा करुन करदात्यांना निवासी मालमत्ता करावरील दंडात सूट देवून दिलासा दिला आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे निवासी करदाते थकीत मालमत्ता कर, चालू वर्षाचा कर त्यांना आकारण्यात आलेल्या शास्तीच्या 10% अशी एकत्रित रक्कम महापालिकेकडे 12 मार्च 2026 ते 25 मार्च 2026 या कालावधीत जमा करतील अशा निवासी करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41 (1) अन्वये आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये 90% सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या करदात्यांनी या निर्णयापूर्वी त्यांचा निवासी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केला असेल, अशा करदात्यांना सदरची योजना लागू असणार आहे. या योजनेचा उद्देश नागरिकांना थकीत निवासी मालमत्ता कर भरण्यास प्रोत्साहन देणे हा असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले.

महापालिकेच्या प्रभाग समिती स्तरावरील सर्व संकलन केंद्रांवर कार्यालयीन दिवशी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00 या वेळेत तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवार-रविवारी सकाळी 10.30 ते दुपारी 4.00 या वेळेत कर भरता येणार आहे. तसेच महापालिकेच्या www.thanecity.gov.in⁠ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध असून Google Pay, PhonePe, Paytm आणि BHIM अॅपद्वारेही सुलभतेने कर जमा करु शकतील. करदात्यांना कराचे देयक पाहणे व कर भरणे सुलभ व्हावे यासाकरिता +912225331590 या WhatsApp, Chatbot ही प्रणाली ठाणे महापालिकेने कार्यान्व‍ित केली असून, करदाते याद्वारे देखील सुलभतेने कर जमा करु शकतील.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांनी या संधीचा लाभ घेऊन थकीत मालमत्ता कर भरावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुध्दरत्न सागर वेलफेअर फाऊंडेशन आयोजित आठवी आंतरराष्ट्रीय बौध्दधम्म परिषद २०२६

प्रती, मा. संपादक / प्रतिनीधी/ छायाचित्रकार यांस.. आपणांस कळविण्यात येते की, ठाण्यामध्ये आठवी आतंरराष्ट्रीय धम्म परिषदेची आयोजन केले आहे. खालील वृत्त आपल्या लोकप्रिय वृत्तपत्र व वृत्तवाहीनी मध्ये प्रसिध्द...

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी*

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी* *जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश* ठाणे,दि.27(जिमाका): समाजमाध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर...

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला...

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला सादर; महापौर शर्मिला पिंपळोलकर सभेच्या अध्यक्षस्थानी सन 2026-27 च्या मूळ अर्थसंकल्पातील...

मुंब्रा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५० जणांचा घात केला;

मुंब्रा येथील एकाच कुटुंबातील तिघांनी तब्बल ५० जणांचा घात केला; मुंब्रा परिसरात गुंतवणुकीच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पावधीत दुप्पट-तिप्पट परतावा देण्याचे...

error: Content is protected !!