Homeक्राईमBadlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं; चार वर्षीय चिमुकलीसोबत चालकाकडून संतापजनक कृत्य,...

Badlapur Crime : बदलापूर पुन्हा हादरलं; चार वर्षीय चिमुकलीसोबत चालकाकडून संतापजनक कृत्य, ‘त्या’ स्कूल व्हॅनबाबत धक्कादायक माहिती समोर

Badlapur Crime News : बदलापूर येथे स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. ज्या व्हॅनमध्ये ही घटना घडली. त्या व्हॅनबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

ठाणे : बदलापूर शहरात पुन्हा एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. याआधी बदलापूरच्या एका नामांकित शाळेत चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा एन्काउंटर केला होता. त्यानंतर आता पुन्हा अशी घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. बदलापुरात 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्कूलव्हॅन चालकाने चिमुरडीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर चिमुकलीची सध्या वैद्यकीय तपासणी सुरु असल्याची माहिती आहे.

व्हॅनबाबत धक्कादायक माहिती उघड

बदलापूर पश्चिमेत स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित स्कूल व्हॅनवर कडक कारवाई केली आहे. तपासादरम्यान या स्कूल व्हॅन चालवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत RTOने संबंधित व्हॅनचा परवाना रद्द करत 24 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

स्कूल व्हॅनची तोडफोड

ही घटना उघड झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोडकरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता चेंदवनकर यांच्याकडून संबंधित व्हॅनवर दगडफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, बदलापूर पोलीस ठाण्यात तणावाचं वातावरण असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा चिमुकलीला स्कूल व्हॅनमधून शाळेत घेऊन जात होता. या दरम्यान त्याने चिमुकलीसोबत स्कूल व्हॅनमध्ये गैरवर्तन केले. यावेळी आरोपीने पीडित चिमुकलीला मारहाण देखील केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण खूप भयंकर असल्याचे संकेत मिळत आहेत. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून स्कूल व्हॅन चालकाला अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या संगीता चेंदवणकर या घटनेनंतर प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाने काही नियम तयार केले होते. त्या नियामांचे पालन का झाले नाही? असा जाब त्यांनी विचारला आहे. दरम्यान, पोलीस ठाण्याच्या आवारात संबंधित स्कूल व्हॅन आली तेव्हा चेंदवणकर आणि त्यांच्यासोबतच्या काही महिला कार्यकर्त्यांनी त्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बुध्दरत्न सागर वेलफेअर फाऊंडेशन आयोजित आठवी आंतरराष्ट्रीय बौध्दधम्म परिषद २०२६

प्रती, मा. संपादक / प्रतिनीधी/ छायाचित्रकार यांस.. आपणांस कळविण्यात येते की, ठाण्यामध्ये आठवी आतंरराष्ट्रीय धम्म परिषदेची आयोजन केले आहे. खालील वृत्त आपल्या लोकप्रिय वृत्तपत्र व वृत्तवाहीनी मध्ये प्रसिध्द...

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी*

*ठाणे जिल्ह्यात बाटली किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी* *जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश* ठाणे,दि.27(जिमाका): समाजमाध्यमांवर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा आणि बातम्या पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर...

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला...

कोणतीही करवाढ व दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी महासभेत केला सादर; महापौर शर्मिला पिंपळोलकर सभेच्या अध्यक्षस्थानी सन 2026-27 च्या मूळ अर्थसंकल्पातील...

*निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – महापौर शर्मिला पिंपळोलकर...

*निवासी मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 90% सूट योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे आवाहन* विशेष प्रतिनिधी ठाणे (11) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांसाठी निवासी...

error: Content is protected !!